मोबाइल लोकेशनद्वारे करोनाबाधितांचा माग

अंबरनाथ:देशात आणि राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये| वाढ होत असताना, करोनाचा प्रभाव अधिक असलेल्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या शोधासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. करोनाप्रभावित परिसर किंवा मोठी संमेलने, शहरे येथून आपापल्या भागातील नागरिकांनी प्रवास केला होता का, ते त्या काळात तेथे हजर होते का, याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिस व प्रशासन त्या व्यक्तींच्या मोबाइलसंपर्काचा माग काढत आहेत.