जेरूसलेम - करोना व्हायरस १८० देशांमध्ये थैमान घालत असून यामुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत. आणि सर्व निर्देशांचे पालन करत आहेत.दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू यांना वारंटाईन अवस्थेत राहण्याची सुचना त्यांच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तातडीने पंतप्रधानांनाही वारंटाईन राहण्याची सुचना करण्यात आली आहे.
इस्त्रायलचे आरोग्य मंत्री करोना पॉझिटिव्ह