मुंबई: भारतातील सर्वात मोठी आरोग्य सेवा शृंखला अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने कोविड-१९ विरोधात सुरु केलेल्या प्रोजेक्ट कवच या योजनेची घोषणा २६ मार्च रोजी केली गेली होती. कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी संसर्गाची साखळी तोडण्याच्या BREAKTHE CHAIN धोरणामध्ये आयसोलेशन (विलगीकरण) हा सर्वात मोठा भाग आहे. 'प्रोजेक्ट स्टे आय' हा कोविड-१९ विरोधातील लढाई अधिक जास्त मजबूत करण्याचा अभिनव उपक्रम आहे. यासाठी किफायतशीर आणि सुरक्षित खोल्या, स्वच्छ वातावरण रातोरात तयार होणे सुनिश्चित करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स ने हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओयो रूम्स, लेमन ट्री, जिंजर हाटेल्स आणि झोमंटो सोबतच्या सहयोगा तून ‘प्रोजेक्ट स्टे आय' हा उपक्रम करण्यात आला. यामध्ये कारंटाईनसाठी थोड्याफार वैद्यकीय देखभालीची सुविधा असलेल्या आयसोलेशन रूम्स जातील, विषाणूचा फैलाव न होता लोकांना ठीक करण्यासाठी बॅरियर निर्माण केले जातील. आयसोलेशन रूम्स भारतातील प्रमुख शहरांत असतील. नवी मुंबई, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगलोर या शहरांमध्ये ५०० खोल्यांपासून सुरुवात करत दर तीन दिवसांमध्ये ५० खोल्या अशाप्रकारे ही संख्या वाढवत नेली जाईल, संपूर्ण देशभरात ५००० खोल्यांचे उद्धिष्ट पूर्ण केले जाईल. सरकारकडून विनंती, सूचना, स्थानिक आरोग्यसेवा पुरवठादारां कडून आणि सीएसआरकडून मिळणाऱ्या समर्थनानुसार इतर शहरांमध्ये देखील हा उपक्रम वाढवला जाईल. या संधर्भात बोलताना अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जांईंट मनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, आजार मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी स्क्रिनिंग, टेस्टिंग आणि अति धोका असलेल्या लोकांना राज्यातील कारंटाईन सुविधांमध्ये ठेवण्यासाठी भारत सरकारकडून उचलली जात असलेली पावले नक्कीच कोतुकास्पद आहेत. कोविड- १९ च्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे ज्यांना क्वारंटाईन गरजेचे आहे अशा लोकांची संख्या खूप वाढेल. यामुळे कारंटाईनसाठी सरकारी सुविधांवरील ताण खूप जास्त वाढेल. हीच वेळ आहे की खाजगी क्षेत्राला आपल्या सरकारची मदत करण्यासाठी आणि सरकारी क्षमता वाढवण्यासाठी पुढे आले पाहिजे. आमचे सहयोगी एसबीआय, एचयूएल, ड्यूश बँक, ओयो हॉटेल्स अँड होम्स, लेमन ट्री हॉटेल्स, झोमंटो इत्यादींचे आम्ही आभारी आहोत, त्यांच्या सहयोगामुळे हा उपक्रम सुरु करणे शक्य झाले एचयूएल यांच्या तर्फे ए केटेगरी खोल्यांपैकी (ओयो) ५०% खोल्या गरजू व गरिबांसाठी मोफत दिल्या जातील. स्टे आय अंतर्गत खोली बुक करण्यासाठी WWW.ASKAPOL LO.COM वर जाऊन होम पेजवरील फॉर्म भरावा लागेल. किंवा १८६०५०० ०२०२ या हेल्पलाईन क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल. अपोलो हॉस्पिटल्सची टीम तीन तासांच्या आत बुकिंग कन्फर्मेशन आणि चेक-इनसाठी आवश्यक बाबी या माहितीसह त्या व्यक्तीला संपर्क करेल. अपोलो हांस्पिटल्स दर दिवशी दोन व्हर्म्य अल मेडिकल राउंड्सची सुविधा प्रदान करेल, यामध्ये एक विशेषज्ञ ASKA POLLO / २४/७ प्लॅटफॉर्सवर चोवीस तास उपलब्ध असेल.
आठ कंपन्यांनी कोरोना विलीगीकरणा साठी घेतला पुढाकार