महत्वाच्या घडामोडी सील वरळी कोळीवाड्यातून समुद्रमार्गे माहीमफेरी; ५ जण अटकेत

मुंबई: वरळी कोळीवाडा हा भाग करोनासाठी मुंबईत सर्वाधिक संवेदनशील बनला असताना या भागातील लोक अ व २ य क किराणा व अन्य व स त आणण्यासाठी बंदी आदेश मोडून स म द्रमा र्ग माहीमला जात अ स ह य । ची धक्कादायक बाब पुढे आली असून पोलिसांनी अशा पाच जणांना अटक केली आहे. ___ वरळी कोळीवाड्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील एका कोळी नेत्याचाही करोनाने मृत्यू झाला. वरळीतील कंम्प भागातील एका पोलीस कॉन्स्टेबललाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर वरळी कोळीवाडा पूर्णपणे सील करण्यात आला आहे तर वरळी कम्पचा काही परिसर सील करण्यात आला आहे. असे असताना काही नागरिक असंवेदनशीलपणे वागत असल्याचे निदर्शनास आले आहे. __ वरळी कोळीवाड्यातील अनेक नागरिक किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी सध्या समुद्रमार्गे माहीमला जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या आधारे पोलिसांनी टेहळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले असून आतापर्यंत पोलिसांनी अशा पाच जणांना अटक केली आहे.