जागतिक बँकेकडून भारताला अर्थसहाय्य मंजूर

नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनातून सावरण्यासाठी जागतिक बँकेने वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी मोठ्या पंकेजची घोषणा केली. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरजू राष्ट्रांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपकरणे घेण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल. भारताला जागतिक बँकेकडून १० कोटी डॉलर इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. __ कोरोनासाठी अत्यावश्यक असणारे किट तसेच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील शोध मोहिमेसाठी हा निधी वापरता येईल. नवीन कक्ष तसेच लंबोरेटरीसाठी भारताला सध्याच्या घडीला आवश्य असलेल्या पैशांची गरज या निधीमुळे दर होण्यास मदत होणार आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात आतापर्यंत ५३ जणांनी जीव गमावला आहे. दोन हजारहन अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून देशातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. केंद्र सरकारने वेगाने होणाऱ्या संक्रमणाला रोखण्यासाठी २१ दिवस लाकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे देशातील गरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.केंद्र सरकारने यावर उपाय योजना करत काही घोषणा केल्या. लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मोदींनी पीएम केअर्स फंडात आर्थिक | मदत करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. देशातील नामांकित कंपन्या आणि सामान्य जनतेपासून ते उद्योगपती आणि प्रसिद्ध व्यक्त सढळ हाताने मदत करताना पाहायला मिळत आहे. जागतिक बँकेनेही भारताला मदत दिली असून ही मदत भारतासाठी खूपच मोलाची ठरेल. आरोग्य मंत्री